कुंभोज (विनोद शिंगे)
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असून, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी युवा सेनेकडुन श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येथे दत्त चरणी पंचामृत अभिषेक प्रार्थना करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्ष या महायुतीला जनतेने भरघोस यश दिले. ही किमया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे झाली आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायला मिळावी, यासाठी येथे दत्त चरणी प्रार्थना करून साकडे घालण्यात आले.
यावेळी दत्त मंदिरात अमित हंगे पुजारी यांच्यामार्फत युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांच्यावतीने पंचामृत अभिषेक सेवा अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली. व साकडे घालण्यात आले.
याबाबत बोलताना युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव म्हणाले, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण त्याचबरोबर अन्य योजना राबवून गोरगरीब जनतेसोबत राहिले आहेत. त्यांची सुखदुःख जाणून घेतली असा सर्वसामान्य लोकांच्यावर प्रेम करणारा व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ज्या माध्यमातून ते महाराष्ट्रातला जनतेची पुन्हा सेवा करतील यात तीळ मात्र शंका नाही. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे . यासाठी आम्ही आज दत्त चरणी प्रार्थना करून साकडे घातले आहे.
यावेळी युवा सेनाराज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे ,युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे, विधानसभा प्रमुख सचिन पाटील, उपतालुकाप्रमुख प्रवीण दळवी ,तालुकाप्रमुख आकाश शिंगाडे, रवी कोकणे, दिग्विजय चव्हाण ,युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित होते.