जवाहर साखर कारखाना संचालक पदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड

कुंभोज : कल्लाप्पाण्णा‌ आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी येथे सुभाष जाधव यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कल्लाप्पाण्णा‌ आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलआवाडे यांनी त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी बँकेचे व्हा चेअरमन संजय अनीगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक द्वारकाधीश सारडा, बाळकृष्ण पोवळे, बंडोपंत लाड, शैलेश गोरे, श्रीशैल कित्तुरे, रमेश पाटील, बाबुराव पाटील तात्यासो अथने, सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, आण्णासो नेर्ले आदि उपस्थित होते.