कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे
तसेच त्यांच्यावर जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुश्रीफ यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गडहिंग्लज येथे विजयोत्सव सभा आयोजित करण्यात आली होती. हसन मुश्रीफ यांचे आगमन होताच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत फटाक्यांच्या अतिशबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. महेश सलवादे यांनी स्वागत केले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, आपल्याला सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद, नियतीचे पाठबळ आणि रुग्णसेवेचे फळ मिळाले आहे. तुमच्या हक्काचा माणूस म्हणून काम करणार आहे, सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आमदारकीचा षटकार मारला आहे. गडहिंग्लज शहराला यापूर्वी १३० कोटीचा निधी दिला असून, भविष्यात गडहिंग्लज शहर राज्याच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्लशील राहणार आहे. प्रत्येक क्षण सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी देणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एम. आय,डी.सी.मध्ये नवीन उद्योग आणून बेरोजगारी संपुष्टात आणणार आहे. बेघरांनातीन हजार घरे, फुटबॉल स्टेडियम, उपजिल्हा रुग्णालयात एम. आर.आय., गडहिंग्लजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेणार आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजना, मोफत गँस सिलिंडर, मुलीना मोफत शिक्षण, महिलांना बसमध्ये सवलत, २०२९ सालापर्यत धान्य, आनंदाचा शिधा, शेतकऱ्यांना मोफतवीज, शेतकरी सन्मान योजना पुढे चालू राहणार असून, कोल्हापूर शहरात मोठे आय, टी. पार्क करण्याचे स्वप्न आहे. असे हि ते यावेळी म्हणाले. .तसेच त्यांनी गडहिंग्लज शहर आणि कडगाव जि. प. मतदार संघातून मताधिक्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यात ७५०० बांधकाम कामगारांची नोंदणी केली आहे. शहरातील जमीन हडपल्याचा आरोप करणाऱ्यांच्या आणि नातेवाइकांच्या नावावर कुठे कुठे गाळे आहेत याची नावे वाचून दाखवली. यापूढे प्रस्थापितांविरूद्ध विस्थापितांचीलढाई सुरू राहणार असल्याचे सांगितले.
नरेंद्र भद्रापूर, बसवराज खणगावे यांनी आपण त्यांच्या कारभाराला, त्रासाला आणि अपमानाला कंटाळून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले.
किरण कदम म्हणाले, येत्या निवडणुकीत विरोधकांचा हिशेब चुकता करूया, त्याचे भ्रष्टाचार व दादागिरी सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजेत, यासाठी मोबाईलवरील रेकॉर्डिंग ऐकवले. विरोधकांनी तथ्यहीन आरोप करू नयेत. आ. मुश्रीफ यांच्या सारख्या श्रेष्ठ नेत्यावर शिंतोडे उडवू नयेत, असा इशारा दिला. यावेळी सिद्धार्थ बन्ने,सतीश पाटील, शिवाजी भुकेले, रमेश रिंगणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रकाश पताडे, आप्पा शिवणे, अनुप पाटील, अँड,विकास पाटील, अमर मांगले, राहुल शिरकोळे,वसंतराव यमगेकर, दयानंद पाटील, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.