मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत.
यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले कि, आव्हाड हे ठाण्याचे आहेत, त्यामुळे मित्र म्हणून ते भेटायला आले असतील असे उदय सामंत म्हणाले. आव्हाड आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच आहे असे हि ते म्हणाले.