शपथविधीचा मुहूर्त ठरला !

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख ही समोर येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.