माझा विजय हा जनतेचा विजय आहे : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी . पाटील यांचा ३८ हजार ५३ मतांनी पराभव केला. झालेल्या विजायानंतर प्रकाश आबिटकर यांनी जनतेचे आभार मानले. आबिटकर म्हणाले, माझा विजय हा जनतेचा विजय आहे गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांची पोचपावती आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी पुनःश्च माझ्यावर विश्वास दाखवून राधानगरी विधानसभा मतदार संघातून पुन्हा आपला आमदार म्हणून निवडून दिले आणि आपल्या सेवेची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे.

 

 

मी आपणास विश्वास देतो कि राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समृद्धीसाठी मी माझ्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करेन. माझा विजय हा जनतेचा विजय आहे गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांची पोचपावती आहे.

या विजयासाठी मतदान केलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि अहोरात्र कष्ट करून विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे पुनःश्च मनःपूर्वक आभार !

🤙 9921334545