पर्थ : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पर्थमधील ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारा पहिला परदेशी संघ ठरला आहे. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
यशस्वी जैस्वालच्या 161 धावा आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी 533 धावा करुन डाव घोषित केला होता. पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऐतिहासिक पुनरागमनात मोठी भूमिका बजावली. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची ऐतिहासिक विजयाने सुरूवात केली आहे. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 58.4 ओव्हरमध्ये 238 धावांवर गुंडाळला. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे .