सामान्य लोकांचा जीवनस्तर उंचावण्याची प्राथमिकता महाविकास आघाडी सरकारची : सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी मुडशिंगी येथे आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली.

 

 

महागाई नियंत्रण आणि रोजगार वाढ याद्वारे सामान्य लोकांचा जीवनस्थर उंचावण्याची प्राथमिकता महाविकास आघाडी सरकारची असणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी मतदारांना केले.

यावेळी डॉ. अशोक पाटील, सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह बाबासाहेब माळी, संजय पाटील, शिवसेनेचे पोपट दांगट, राजू यादव, संजय पाटील, आनंद बनकर, प्रदिप झांबरे, सचिन पाटील, शोभा राजमाने, शारदा बनकर, विजय पाटील तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706