उदगांव : माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आम्ही चळवळीचा निर्णय वेगळा व राजकीय निर्णय वेगळे घ्यावे लागतील अशी सूचना दिली, तरीही त्यांनी दुर्लक्षित केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी महायुती बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील विकासाचा डोंगर उभा केलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या महायुती पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, तेव्हा प्रचंड मतांनी त्यांना विजयी करून आपला विकास साधूया, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक यांनी येथे बोलताना केले.
उदगाव येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, हा निर्णय आम्ही तातडीने घेतला नाही. शिरोळ तालुक्यातील गावा – गावांचा दोन महिने दौरा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सांगितला, महायुती सोबत गेल्याखेरीज आणि सत्तेत सहभागी झाल्याखेरीज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे त्यांना आम्ही पटवून दिले. सर्व कार्यकर्त्यांनी महायुती सोबत जाण्याचे मान्य केले. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते, चळवळीचा निर्णय वेगळा आणि राजकीय निर्णय वेगळे असायला हवेत, आणि मी राजकीय निर्णय वेगळा घेणार असे ऊस परिषदेत स्पष्ट केले होते.मात्र,आमचे नेते राजू शेट्टी यांनी त्यावर काहीही बोलले नाहीत. मग आम्ही पुन्हा बैठक घेऊन महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
त्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक ही उमेदवार उभा करायचा नाही’ मी उमेदवार नसणार हे दोन महिन्याच्या अगोदरच सांगितले होते. आणि स्वाभिमानीचे नेते देखील उभे राहू नयेत, किंवा दुसऱ्यालाही उभे करून बाद करू नका, यासाठी आमचा आग्रह होता. तथापि त्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यानंतर राजकीय निर्णय घेत असताना महायुतीलाच का पाठिंबा द्यायचा, यावर चर्चा झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मान प्रतिष्ठा सत्तेत व हवा राजकारणात मिळावा, आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावे यासाठी हा आमचा खटाटोप आहे.
याकरिता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली सविस्तर चर्चा त्यांच्याबरोबर झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी असलेली तळमळ हे मुख्यमंत्र्यांच्या प्रति दिसून आले. त्यांनी मागील १०० रुपयाचे पत्र तात्काळ काढले,तसेच पुढील हंगामासाठी ३ हजार ७०० रुपयाचा दर मिळावा यासाठीचे निवेदन देखील त्यांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्यासाठी ७ एचपी विद्युत बं पंपाचे बिल माफ केले आहे. शेतकऱ्यांचा विज बिल माफ करणारा हा पहिला मुख्यमंत्री म्हणावा लागेल लागेल. महाराष्ट्राला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे.शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. विविध लोककल्याणकारी योजना सामान्यांच्या हितासाठी त्यांनी सुरू केले आहेत.यासाठी महायुतीला आम्ही पाठिंबा दिला आहे. चळवळ वेगळी व राजकारण वेगळं हे आम्ही आता ओळखलो आहे. असे सांगून ते म्हणाले, कै. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरची संगत सोडली त्या सरकारवरच आमचे नेते टीका करू लागले, त्याचवेळी आम्ही आमचे नेत्यांना पाच वर्षे थांबूया असे सांगितले असताना त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही.
काहीही झाले तरी स्वाभिमानीचे माझे नेते राजू शेट्टीच राहणार कारण ते चळवळीचे बाप आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी चळवळ टिकली पाहिजे. यासाठी माझे प्रयत्न राहतील. साखर कारखानदार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबरोबर शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी व कारखानदार एकत्र बसून अगोदर सन्माननीय तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजकारणामध्ये माझ्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यास मीच आमदार झाल्यासारखे मला वाटेल असेही त्यांनी सांगितले. याचे खरे शिल्पकार माजी आमदार महादेवराव महाडिक हे आहेत, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, माझ्यावर टीका करण्याचा कोणताच मुद्दा नसल्याने कमिशनचा मुद्दा उपस्थित करून चर्चेचा गुराळ मांडलं जात आहे. १० वर्षे खासदारकी, ५ वर्षे आमदारकी या कालावधीत कमिशनचा हिशोब आम्ही काढला तर काय होईल ? आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि युवकांच्या हातात दगड देणार नाही तर त्यांच्या रिकाम्या हाताला काम आणि उद्योग व्यवसाय उभारून त्यांचा विकास करू. असे सांगून त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कार्याचा आढावा मांडत असताना ते म्हणाले, अनेक वर्षे रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जयसिंगपुरात उभा करण्याचं भाग्य मला मिळालं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येणाऱ्या २८ तारखेला आगमन सोहळा मोठ्या दिमाखात घडवून आणून सर्वानुमते ठरलेल्या जयसिंग महाराज उद्यानात हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. सावकार मादनाईक यांनी मला भावाप्रमाणे पाठिंबा दिला आहे. सावकर माज नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना हा राजेंद्र पाटील यड्रावकर हा कसुबरही अंतर देणार नाही. यात कमी पडलो तर बापाची औलाद सांगणार नाही, असे अभिवचन दिले. प्रारंभी स्वागत संजय चौगुले यांनी केले.
यावेळी संजय सावगावे,आक्काताई तेली,ॲड.हिदायत नदाफ,शैलेश आडके,मिलिंद साखरपे,नंदकुमार पाटील,सतिश मलमे आदींनी मनोगती व्यक्त केली.
यावेळी कुबेर मगदूम,सरपंच सलिम पेंढारी,उपसरपंच अरुण कोळी,जालिंदर ठोमके, कुणालसिंह नाईक निंबाळकर,शैलेश आडके, शोभा कोळी, राजू मगदूम, मिलिंद साखरपे, सतेंद्रराजे नाईक निंबाळकर, सरदार सुतार
संजय चौगुले, बाचू बंडगर,आर.जी.वरेकर,मधुकर निकम,दिलीप कोळी,दिलीप कांबळे,बंटी जाधव,पंकज मगदूम,थबा कांबळे,हैदरअली मोकाशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
