विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहोचवणाऱ्या ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : निगवे खालसा येथे आमदार सतेज पाटील आणि उत्तराखंडचे आमदार काजी निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.

 

 

 

आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी विकासाची गंगा कोल्हापूर दक्षिणच्या प्रत्येक गावात पोहोचवली. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी केले.

या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ओबीसी संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटील, श्रीपती पाटील, बी. डी. किल्लेदार, एल. एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील, जगदीश चौगले, सागर पाटील, अशोक किल्लेदार, पी. एम. पाटील, पोपट कांजर, शहाजी किल्लेदार, अशोक पाटील, विजय कांबळे, गजानन पाटील, जयवंत घाडगे, संदीप तवंदकर, श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

🤙 8080365706