आमदार यड्रावकर यांनी कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास दाखवला : खासदार धैर्यशील माने

सैनिक टाकळी : कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास करून आपले कार्यकुशल नेतृत्व सिद्ध केले आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघाला परिवार म्हणून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन विकासाची उत्कृष्ट वाट दाखवणारे आणि तालुक्याला समृद्ध करणारे लोकप्रिय आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे आहेत. त्यांना या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी देवून विधानसभेत पाठवा,असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी सैनिक टाकळी येथे झालेल्या सभेत केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आमदार यड्रावकर यांनी १ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या तालुक्याला विकासाची परंपरा आहे.देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, कै.खासदार बाळासाहेब माने, स्व.दत्ताजीराव कदम,स्व.सारे पाटील, स्व.दिनकरराव यादव,स्व. शामरावअण्णा पाटील यांनी तालुक्याची जडण – घडण केली आहे. समृद्ध तालुका करून सामाजिक एकोपा ठेवला आहे. या थोर नेत्यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आरुढ होऊन आमदार यड्रावकर यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.

 

 

 

जातीयवादाला मूठ माती देऊन जातिवंत नेते पद सिद्ध केले आहे.भविष्याचा वेध घेणारी ही निवडणूक आहे. शिरोळ तालुक्याचे अस्तित्वाची लढाई आहे. आमदार कसा असावा,हे गेल्या पाच वर्षात आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आमदार यड्रावकर यांनी ओळख करून दिली आहे.या विकास कामाला अधिक गती देण्यासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे,असे सांगून ते म्हणाले,राजेंद्र पाटील यड्रावकर व विरोधी उमेदवारांची तुलना करावी,या तालुक्याचे प्रश्न काय आहेत ? , ते प्रश्न कसे सोडवावेत ? चिकाटी, जिद्द आणि त्या प्रश्नाविषयी असलेली तळमळ असायला हवी ती धमक केवळ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातच आहे.या करण तालुक्यात दळणवळ,औद्योगिकरण याचे नियोजन त्यांनी केलेले आहे.२३ तारखेनंतर अनेकांची डोकी फिरणार आहेत.इतका ऐतिहासिक निकाल महायुतीला या तालुक्यातून मिळणार आहे.त्यामुळे डोकी फिरलेल्यांना आमदार यड्रावकर यांनी मंजूर केलेल्या मनोरुग्णालयात भरती करावे लागणार आहे.सर्वांना बरोबर घेऊन मुख्य प्रवाहात अणण्याचं काम आमदार यड्रावकर यांनी केले आहे.

बरोबर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी गेले अनेक वर्षे राजकीय संघर्षात घालवली मात्र अखेरच्या टप्प्यात त्यांची युती झाली,ही युती काही काळ अगोदर झाली असती तरी लोकसभा आणि विधानसभेचा मतदारसंघ प्रगतीपथावर विकासाच्या वाटेवर राहिला असता. त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगायोगाने मी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर एकत्र असल्यामुळे या मतदारसंघाचा व तालुक्याचा विकास अधिक जोमाने होण्यास काहीच हरकत नाही.असे सांगून त्यांनी खिद्रापूर पर्यटन स्थळ व्हावे,त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्नशील आहेत,मात्र या परिसराचाही पर्यटन स्थळामध्ये समावेश करावा आणि मी सुविधा त्या सर्व सोयी सुविधा या परिसराला मिळाव्यात अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले,कुटुंब पद्धतीमुळे एकराची शेती आता गुंठ्यात वाटणी होऊ लागली आहे. त्यामुळे शेती उत्पन्न कमी होत असल्याने त्यांना नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे.आजी – माजी सैनिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मिलिटरी कॅन्टीन येथे असावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून आहे.ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि मी राज्य आणि केंद्र शासनाची पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून आमदार विकास निधीतून त्या जागेवर कॅन्टीनचे बांधकाम ही करून देवू,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील म्हणाले, सैनिक टाकळी सह दतवाड मतदार संघात आमदार यड्रावकर यांना सर्वाधिक मतदान देऊ,आता सुट्टी नाही सुट्टी वाजणारच असे त्यांनी सांगितले.

यावेळी संभाजी गोते,बाळासाहेब कोकणे,बबन यादव,प्रा.चंद्रकांत मोरे, हरिश्चंद्र पाटील,प्रमोद दादा पाटील, रणजितसिंह उर्फ बापू पाटील,सतीश मलमे आदींची मनोगते झाली.

यावेळी कुशाल कांबळे,लक्ष्मण चौगुले, रावसाहेब कुंभोजे,विठ्ठल पाटील,राकेश खोंद्रे,नंदकुमार नाईक,बाबासो वनकोरे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचलन सागर बिरणगे यांनी केले