कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य ऐतिहासिक निर्धार सभा गावचावडी समोरील चौक, शहापूर, इचलकरंजी येथे संपन्न झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीनजी गडकरी, खासदार धैर्शयील माने, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष . सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, क.आ. जनता बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, मोश्मी आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी इचलकरंजीसाठी नवी स्वप्ने उभी केली. आपल्या भाषणात त्यांनी इचलकरंजीसाठी असलेल्या योजनांचा उल्लेख करत सांगितले की, इचलकरंजीचा विकास हा राहुल आवाडे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथल्या विकासासाठी निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही. मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या काळात इचलकरंजी हे देशातील प्रगत शहरांपैकी एक असेल. त्यांच्या या शब्दांनी जनतेच्या आशा अधिकच बळकट केल्या.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाजप शहर अध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे, दादासो भाटले, चंद्रशेखर शहा, रणजित अनुसे, दिलीप मुथा, राजेश रजपूत, सतीश डाळ्या, बाळकृष्ण तोतला, सतीश मुळीक, सुभास मालपाणी, दिपक राशिनकर, जयेश बुगड, ताराराणी महिला अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड, भाजप महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, शितल शिंदे, भाजप महिला सरचिटणीस सौ. रमा फाटक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
