कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, माजी नगरसेविका संगिता सावंत यांनी कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक विश्वास पाटील (आबाजी), बाळासाहेब खाडे यांच्यासह आर. के. पाटील, विक्रम जाधव, राणोजी चव्हाण, राहुल काळे, गौरव सावंत, कुलदिप सावतकर, सदाशिव कवडे, बाळासाहेब पाटील- गुडाळकर, विकी कांबळे, रवी राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
