राहुल आवाडेंनी इचलकरंजीतील स्वामी विवेकानंद परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर : इचलकरंजी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी त्यांच्या प्रचारार्थ नागरिकांसी संवाद साधत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद कॉलनी परिसर येथे नागरिकांशी राहुल आवाडे यांनी संवाद साधला.

 

‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राहुल आवाडे यांनी प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आवाडे म्हणाले, या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळाली नाही, तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली, ज्यामुळे मनाला समाधान आणि उद्दिष्टे साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली.

तसेच आजपर्यंत केलेल्या कामांच्या बद्दल नागरिकांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आणि त्यांच्या सूचनांमुळे पुढील कामांना दिशा मिळाली आहे असे सांगत आपल्या विश्वासाने आम्हाला नवी ऊर्जा मिळते, आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू, याचा आम्हाला दृढ विश्वास आहे असे नागरिकांना सांगितले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह स्वामी विवेकानंद कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.