प्रलंबित प्रश्नासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा- डॉ. सुजित मिणचेकर

कुंभोज : निलेवाडी येथील महिलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिनचेकर यांचे समोर आपल्या समस्या मांडल्या . गेल्या पाच वर्षात निलेवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा कोणतही काम झाले नाही त्याबद्दल त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली. परंतु मिणचेकर यांनी मी तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला परंतु 2019 नंतर मी आमदार नसल्यामुळे पुढचं काम करता आलं नाही पण मी निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न निलेवाडी चा सोडवणारच असा शब्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी उपस्थित महिलांना दिला.

 

 

 

यावेळी त्यांनी गावातून पदयात्रा काढून विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजयी करण्याचे आव्हान केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह प्रहार संघटना व डॉक्टर सुजित मिणचेकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545