कोल्हापूर : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ व आसपासच्या भागातील उपस्थित नागरिकांशी क्षीरसागर यांनी संवाद साधला. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी भेटी देत असताना माता भगिनींकडून लाडकी बहीण योजनेचे कौतुक होताना दिसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून आम्ही सदैव त्यांचे सोबत उभा राहणार असल्याचे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.