धरणगुत्ती : धरणगुत्तीच्या विकासाबाबत माझ्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामात किती खोडा घातला,याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. विकास कामात खोडा घालणारे विरोधकांना आता जनता कंटाळली असून येथे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा मतदार आपल्या मत पेटीतून दाखवतील,असा टोला आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकरे यांनी लगावला.
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मतदारांशी संवाद साधला यावेळी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मौजे आगरच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. तसेच तालुक्यासाठी २ हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. या कामांमध्ये जनतेच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले असून त्यामुळेच तालुक्याचा कायापलट झालेला दिसून येत आहे.या विकासात्मक कामाबरोबरच वैयक्तिक लाभांची शासकीय योजनेतून मिळणारी मदत अनेक लाभार्थ्यांना मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे.
यावेळी शिवसेनेचे राकेश खोंद्रे,संजय पाटील,अण्णासो पाटील,शिवाजी जाधव,तानाजी जाधव,संजय सेवेकरी, भाऊसो जगताप,राजू पाटील,संजय पाटील,अजित कांबळे,किरण कांबळे, दरिबा कांबळे,शेखर कांबळे,पिंटू वराळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.