राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास कोल्हापुरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.

 

 

यावेळी क्षीरसागर म्हणाले,गणेश मंडळे, तालीम मंडळांमधील युवकांच्या सुखा दुःखात प्रत्येकवेळी मी ठामपणे उभा राहिलोय. माझी दोन्ही मुलं ऋतुराज आणि पुष्कराज दोघांनीही युवकांशी ऋणानुबंध जपले आहेत आणि त्याची प्रचिती मला नेहमी येते.

माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात युवक असोत, वृद्ध असोत, महिला असोत यांच्यासाठी घेतल्या गेलेल्या हितकारक निर्णयाने प्रभावित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातून युवक एकवटत आहेत याचे चित्र आज कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाले. आज युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आपलं महायुतीचे सरकार काम करत असुन येणाऱ्या काळातही युवकांच्या हिताचे निर्णय आपलं सरकार घेईल हा विश्वास आहे.

🤙 9921334545