हसन मुश्रीफ यांना राष्ट्रीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देताना पहायला मिळत आहे. कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना कागल तालुका राष्ट्रीय मराठा महासंघ सुजित पोवार ,भागवत शेटके, सुशांत खोत, नंदकुमार कुराडे, अजिंक्य तोरसे, उत्तम आवळेकर, भगवान पाटील, सुभाष पाटील, नामदेव लाड, सत्यजित तिप्पे, दिग्विजय पोवार,पवन भराडे, सुजित पोवार, अभिजित तांबेकर, कृष्णात चौगुले, सिद्धांत पोतदार,दिलीप चौगुले, विकास पाटील यांनी आज कागल निवासस्थानी भेटून बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला.

 

 

हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी दिपाली कुदळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545