कोल्हापूर :अतिग्रे येथे हातकणगंले मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री खासदार जयवंतराव आवळे होते.भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाने राजूबाबा आवळे यांच्या पाठीमागे राहण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेतला.
विकासकामे करताना कोणताही गट-तट, पक्ष न पाहता सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊन न्याय दिला. त्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत आवळे यांना पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन जयवंतराव आवळे यांनी केले.
अॅड चिंतामणी कांबळे यांनी ‘भारतीय संविधान व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आर.पी.आय. खरात गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल कांबळे व वंचित आघाडीचे कार्यकर्ते महेश कांबळे व अमित होवाळे यांनी पाठिंबा दिला.
या मेळाव्यासाठी शितल रणदिवे, संदीप सुर्यवंशी, गजानन कांबळे, आकाश मधाळे यांनी परिश्रम घेतले तर नंदकुमार शिंगे, प्रदीप कोठावळे, हर्षल कांबळे, के.पी. कांबळे, संजय कांबळे, मायाप्पा कांबळे, काशिनाथ कांबळे, सुशिल चव्हाण, सुरेश कदम, मारुती चौगुले आदीसह तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.