कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ डी. के.टी.ई. च्या सचिव सपना आवाडे , वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, श्रेणिक मगदूम व अनिल मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत मगदूम कॉलनी, सांगली रोड येथे नागरिक संवाद मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला, त्यात नागरिकांनी आपले मुद्दे मांडले आणि आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला व नागरिकांनी आपल्या मतांद्वारे परिवर्तनाच्या दिशेने एकत्र येण्याचा निर्धार केला आणि राहुल आवाडे यांच्या विजयासाठी एकजुटीचे आवाहन केले.
यावेळी मगदूम कॉलनीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.