करवीर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रयाग चिखली येथे बैठक

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रयाग चिखली परिसरातील गावांमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.

 

 

राहूल पी. एन. पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी या परिसरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणार असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बी.एच. पाटील, दशरथ माने ,बळवंत चौगले, पांडुरंग यादव, प्रभाकर पाटील, धनाजी चौगले, शिवसेनेचे बाजीराव पाटील, भरत पाटील, शंकर पाटील, राम पाटील, पाडळी बुद्रुकचे सरपंच शिवाजी गायकवाड यांच्यासह प्रयाग चिखली परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजर होते.