कुंभोज (विनोद शिंगे )
कुंभोज (ता.हातकणंगले) येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. क्रांती सावंत यांच्या उपस्थितीत समाज मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सत्ताधारी व जातीवादी सरकारच्या विरोधात आपण निवडणूक लढवत असून जातीपातीचे राजकारण करून संपूर्ण राज्यात महागाईचा भडका भडकवणाऱ्या सरकारला व त्यांच्या उमेदवारांना आता जागा दाखवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार क्रांती सावंत यांनी केले.
यावेळी कुंभोज समाज मंदिर तसेच दसरा चौक, शिवाजीनगर, शाहू नगर परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम हे होते यावेळी प्रमोद कदम यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे स्वागत अरुण जमणे हातकणंगले तालुकाध्यक्ष जनार्दन गायकवाड तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.