हातकणंगले मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

कुंभोज (विनोद शिंगे)

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी मध्ये प्रवेश करत आमदार राजूबाबा आवळे यांना पाठिंबा दिला. माजी पालकमंत्री व जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुती व परिवर्तन महाशक्तीचे प्रमुख नेत्यांनी हातकणंगले विधान सभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.

 

 

 

खोची गांवचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील,जनसुराज्य पक्षाचे नेते माजी उपसभापती अजय पाटील ग्रामपंचायत सदस्य राजूकुमार पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अमोल पाटील, अश्विन वाघ, तसेच अमोल आडके, अशोक पाटील, जयराम पाटील, महादेव विकास सेवा संस्था व खोची व्यापारी पतसंस्थाचे पदाधिकारी,संभापूर जनसुराज्य पक्षाचे नेते माजी सरपंच प्रकाश झिरंगे, तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष उदय निकम , सावकर ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र मिरजकर , तानाजी भोसले, आस्लम माहालदार, तानाजी भाउसो भोसले, माजी सरपंच अरूण कारडे व रावसो कारडे, माजी उपसरपंच अवधूत झिरंगे व सावकर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, लाटवडे गांवचे माजी सरपंच संभाजी पवार,गणेश दुध डेअरीचे अध्यक्ष अॅड. शहाजी पाटील, माजी उपसरपंच किरण माळी, ग्रा.पं. सदस्य शिवदत्त पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमर पाटील,आळते येथील शेतकरी संघटनेचे नेते माजी उपसभापती प्रविण जनगोंडा , ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर, अंकुश चौगुले, शेतकरी दुध संस्थेचे अध्यक्ष
आण्णासो पाटील, छञपती विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष गुलाब मुल्लाणी, शिरीष थोरात, नितीन योगाण्णा, स‌द्दाम मुजावर, कुंभोजचे गावाचे माजी पंचायत समिती सभापती संतोष माळी तर अंबपवाडीचे ग्रामपंचायत सदस्य संजय वरखटे, अमित नायकवडी, विक्रम साबळे, दत्ताञय खाडे, युवा नेते पंडीत निर्मळे, माजी उपसरपंच दिलीप साबळे , रामाचंद्र साबळे, ज्ञानू खोत, बबन खाडे, भिमराव चोपडे पाणीपुरवठा संचालक, अशोक खाडे, मधुकर खाडे, पिंटू खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक भगवानराव जाधव यांनी केले. आभार कपिल पाटील यांनी मानले.

महायुतीचे उमेदवार अशोक माने व त्यांचे नेते हे घटक पक्षातील पदाधिका-यांना सापत्न भावाची वागणूक देत आहेत. या वागणुकीमुळे अनेक कार्यकर्ते दुरावले आहेत. तसेच आमदार राजूबाबा यांचे काम व सन्मान या गोष्टी मुळे पुन्हा आमदार करण्यासाठी पाठिंबा देत आहोत.