कुंभोज (विनोद शिंगे)
भाजपच्या तावडीतून देशाचे संविधानाचे रक्षण करणे ही काळजी गरज बनली असून सर्वसामान्य दलित,मागासवर्गीय जनतेला भाजपच्या महायुतीच्या कारभारात जगणे मुश्कील होऊन बसले आहे.त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील बौद्ध समाजाने दक्ष राहून महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना बहुमताने निवडून द्यावे,असा निर्धार आंबेडकर चळवळीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला.
अतिग्रे येथे मतदारसंघातील ५० गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा झाला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व खासदार जयवंतराव आवळे हे होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, आमदार राजूबाबा आवळे यांनी मतदारसंघात पाच वर्षात २५५ कोटी रुपयांची विकासकामे केली.आमदार राजूबाबांनी विकासकामे करताना कोणताही गट-तट,पक्ष न पाहता सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊन न्याय दिला. त्या विकासकामांच्या जोरावर या निवडणूकीत आमदार राजूबाबांना पुन्हा संधी द्या,असे आवाहन जयवंतराव आवळे यांनी केले.
यावेळी अॅड चिंतामणी कांबळे यांनी “भारतीय संविधान व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची भूमिका’ ” या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी आर.पी.आय.खरात गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल कांबळे व वंचित आघाडीचे कार्यकर्ते महेश कांबळे व अमित होवाळे यांनी उमेदवार राजूबाबा आवळे यांना पाठिंबा दिला.
या मेळाव्यासाठी शितल रणदिवे,संदीप सुर्यवंशी,गजानन कांबळे,आकाश मधाळे यांनी परिश्रम घेतले तर नंदकुमार शिंगे,प्रदीप कोठावळे,हर्षल कांबळे,के.पी.कांबळे,संजय कांबळे,मायाप्पा कांबळे, काशिनाथ कांबळे,सुशिल चव्हाण,सुरेश कदम,मारुती चौगुले आदीसह तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.