सीपीआरमधील ऑनलाईन अपंग प्रमाणपत्रे बंद केल्याने अखिल भारतीय हिंदू महासभेचा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर ( युवराज राऊत)

कोल्हापूर सेवा रुग्णालय प्रमिलाराजे सेवा रुग्णालय ही गोरगरीब व सामान्य जनतेची आरोग्य विषयक सेवा करणारी रक्तवाहिनी आहे. परंतु या ठिकाणी सेवा करणारे काही अधिकारी कर्मचारी आणि तकलादू पद्धतीने काम करणारी यंत्रणा , अपंग विभागातील डोळे किंवा कान बहिरत्व असलेल्या पेशंट लोकांना अपंग प्रमाणपत्र दिले जाते परंतु गेली वर्षभर अस्थिव्यंग तसेच अस्थिव्यंग विभागातील ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र बंद केली आहेत. ही अपंग प्रमाणपत्र कोणी बंद केली कोणत्या आदेशाने बंद केले याचा खुलासा व्हावा, अन्यथा अखिल भारतीय हिंदू महासभा जागतिक संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास आपणच जबाबदार असणार ही दखल घ्यावी असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्या वतीने सीपीआर हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 

 

यावेळी उपस्थित अखिल भारतीय हिंदू महासभा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप निवृत्ती सासने, जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेलार ,जिल्हाध्यक्ष दिव्यांग आघाडी
गजानन सुभेदार,शहर उपाध्यक्ष कोल्हापूर दक्षिण स्नेहा आशिष चिले,शहर अध्यक्ष कोल्हापूर उत्तर शीतल तीवडे ,हिंदू राष्ट्र समन्वयक समिती
आनंदराव पवळ ,विनोद पालकर, महेश कांजर,अर्जुन पवार, लहुजी शिंदे,रेणू पवार, अंजना सावर्डेकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545