ब्लॅक पँथर पक्ष आणि चर्मकार समाज संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

कोल्हापूर: जिल्ह्यातील ब्लॅक पँथर पक्ष आणि चर्मकार समाज संघटनेने सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीला पाठींबा दिला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आणि सामाजिक एकता टिकून ठेवायची असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे असल्याचे मत संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले.

 

 

 

यावेळी ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, चर्मकार समाज कल्याणचे दिपक यादव यांच्यासह दयानंद कांबळे, प्रविण निगवेकर, दत्तात्रक बामणेकर, आनंदा कराडे, गोकुळ कांबळे, दिपक कांबळे, वैजनाथ कांबळे, प्रकाश कांबळे, सुधाकर कांबळे, तानाजी गोंधळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545