नृसिंहवाडी: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन विजयाचा निर्धार केला.गावातील प्रमुख मार्गावरून त्यांचा संवाद दौरा संपन्न झाला.
यावेळी भाजपाचे नेते विजय भोजे, शिवसेनेचे शिवाजी मुरलीधर जाधव, मुकुंद गावडे,संतोष खोंबारे,उपसरपंच रमेश मोरे,माजी उपसरपंच अभिजीत जगदाळे,गुरु खोचरे,कृष्णा गवंडी, विजय अनुजे,बजरंग कांबळे,विकास पुजारी,प्रवीण अनुजे,विकास कदम, शितल झळके,सुरेश गवंडी,तानाजी निकम,अविनाश शिंदे,संजय शिरडीकर बाळू अलास्कर रामचंद्र कुंभार, अभिजीत सुतार,तुषार खोत,दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.