कोल्हापूर : राजोपाध्ये नगर येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांशी संवाद साधला.
गेली 20 ते 25 वर्षे महाडिक परिवार समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी महाडिक कुटुंबियांची जवळीकता अधिक वाढली आहे. तसेच भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम केले आहे.
नेहमीच महिलांना पाठबळ देण्याचा व महिलांचा आत्मसन्मान राखण्याचं काम महाडिक परिवाराने केले आहे. यापुढेही कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मा. अमल महाडिक यांना देण्यासाठी 20 नोव्हेंबरला सर्वांनी जास्तीत मतदान करूयात आणि प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी यावेळी केले.
यावेळी मा. प्रा. जयंत पाटील , अमोल माने, मनीषा कुंभार, शुभांगी भवड, संपदा गवळी, श्रद्धा गुळवणी, विजय गवळी, प्रकाश गुळवणी, गणेश सावेकर, पद्माकर पोतदार, नितीन हार्व, पांडुरंग भवड, तानाजी इंगळे, वैभव कुंभार, नितीन कवडे यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.