जोरदार शक्तिप्रदर्शनाने राहुल पाटील यांचा करवीरमधून उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल पी.एन . पाटील यांनी उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानिमित्ताने राहुल पाटील यांनी सोशल साईट वर आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील म्हणाले, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेला हा प्रचंड जनसागर मन भारावून टाकणारा होता. गेल्या अनेक दशकां पासून स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेबांनी केलेली विकास कामे आणि त्यांच्या माघारी करवीर विधानसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा ठरत आहे. याचीच पोचपावती म्हणून ही हजारोंची गर्दी साक्ष देणारी आहे.

 

 

आजचा उमेदवारी अर्ज भरत असताना मन भरून येत आहे .स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन,त्यांच्या पश्च्यात सर्व कार्यकर्त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी आग्रह धरला त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो .मतदार संघातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा निश्चय करत आहे, असे ही ते म्हणाले.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ,जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष विधान परिषदेचे गट नेते  सतेज पाटील ,दक्षिण मतदार संघाचे उमेदवार  ऋतुराज पाटील, उत्तर मतदार संघाच्या उमेदवार  मधुरिमाराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,आमदार जयंत आसगावकर , शिवसेनेचे संजय पोवार , डॉ. चेतन नरके,तेजस्विनी राहुल पाटील,शेतकरी संघटनेचे क्रांतिसिह पोवार, राजू सूर्यवंशी,काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण , डी.जी. भास्कर, R.K. पोवार, K.D.C च्या माजी संचालक श्रीमती उदयनदेवी साळुंखे,माजी नगरसेवक सारंगधर देशमुख यांच्या समवेत अलोट जनसागराच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या पदयात्रेत उपस्थित होते.