कोल्हापूर: इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी झालेल्या परिवर्तन सभेत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकजूटीने अधिक मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर याच्या सह महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.