एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत संजय राऊतांची टीका

शिर्डी या ठिकाणी संजय राऊत यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासह संजय राऊतही होते. साईबाबांवर आमची श्रद्धा आहे. असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री शिर्डीत का आलेत माहीत नाही

“आम्ही शिर्डीत साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. मुख्यमंत्री शिर्डीत का आले माहीत नाही.  शिर्डीतला त्यांचा उमेदवार शंभर टक्के पडणार आहे. आमचे भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डीच्या साईबाबांचाही आशीर्वाद आहे आणि जनतेचाही आशीर्वाद आहे.” असं संजय राऊत म्हणाले.