(खेबवडे, वडकशिवाले, दऱ्याचे वडगाव, गिरगांव गावांत प्रचार दौरा)
कोल्हापूर : समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत ही ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्या आचार – विचारात आहे .ज्या ज्या वेळी समाजाला गरज पडते, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची वेळ येते त्या त्या वेळी आपले सर्वांचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांनी रस्त्यावर उतरून समाजहिताला प्राधान्य दिले आहे. त्यांना विजयी करा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील खेबवडे, वडकशिवाले, दऱ्याचे वडगाव, गिरगांव गावांत प्रचार दौरा झाला.
यावेळी खेबवडे , गिरगांव ग्रामस्थानी, छत्रपती घराणे आणि सैनिक नाते फार जुने आहेत. यापुढेही हे नाते कायम राहतील असा विश्वास दिला. वडकशिवाले गावी राजर्षी शाहू महाराजांच्या शतकमहोत्सवी जन्मदिन वर्षानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शाहू महाराजांची वेशभूषा करणारे कृष्णात ऊर्फ बाळासो पाटील यांचे युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती विशेष कौतुक केले. ग्रामस्थांनी या मिरवणुकितील जुने फोटो दाखवले. छत्रपती घराणे आणि वडकशिवले गावाचे ऋणानुबंध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, उपसरपंच शुभांगी भाट, ग्रामपंचायत सदस्य आनंदी कुंभार, रेखा शिंदे, सुनिता वाडकर, प्रेमा पाटील (खेबवडे), चंदर पाटील, मारुती साबळे, जयप्रकाश पाटील, रवींद्र पाटील, सुहास चौगले, शिवाजी साखरे, रुपाली विश्वास पाटील, स्वाती पाटील, वैजयंती साबळे, विजय वडणगेकर (खेबवडे), कृष्णात ऊर्फ बाळासो पाटील, अमर पारळे, अनिल माने, सरपंच बळीराम पवार, संजय जगताप,किरण पाटील, संपत पाटील, सुरेश पाटील, आरती पराळे, शारदा पाटील, सुजाता हरणे (वडकशिवाले), सरपंच छाया मुळीक, उपसरपंच अर्चना बेणगे, अरुण बोडके, आण्णाप्पा बोडके, अनिल मुळीक, शिवाजी मुळीक ( दऱ्याचे वडगाव ), सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम वि. पाटील, माजी उपसरपंच उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्चना सावंत, गीता पाटील, शीतल चव्हाण, वैशाली वीर, दिलीप जाधव, दिलीप पाटील, शाहीर दिलीप सावंत, कांचन बागणे, राजेश कोंडेकर, संभाजी कोंडेकर, उदय चव्हाण, सुभाष पाटील ( गिरगांव) यांचेसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.