सोने पाॅलीश करण्याच्या बहाण्याने पासार्डेत वृद्धेला गंडा…

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे पासार्डे येथे गुरूवारी दुपारी १२च्या सुमारास सोने पाॅलीश करून देतो अशी बतावणी करून दुर्गा बाबुराव चौगले वय वर्ष ७५ या वृद्धेच्या हातातील ५० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या काढून त्यातील सर्वसाधारण ८.५ ग्रॅम सोने काढून घेतल्याच शनिवारी स्थानिक सोनाराच्या तपासणी अहवाल नंतर सिद्ध झाले.त्यानंतर वृद्धेला व कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला आहे.

रंगाने काळा, धिप्पाड शरीरयष्टी असे त्या व्यक्तीचे वर्णन आहे.पंचक्रोशीत अशी वर्णन असणारी व्यक्ती सोने पाॅलीश करून देत असल्याचे आढळल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यास संपर्क करावा आणि दुपारच्या वेळी अनोळखी व्यक्ती पासुन सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.