दररोज किती बदाम खावे?

बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण लहान मुले, प्रौढ आणि वृद्धांनी त्यांच्या वयानुसार दररोज किती बदाम खावेत हे आपण आरोग्य  जाणून घेऊया.

दररोज किती बदाम खावेत याविषयी कोणतीही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. परंतु काही अभ्यास आहेत. ज्याच्या आधारे बदामाची संख्या ठरवता येईल. त्याचबरोबर बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते सालासह किंवा त्याशिवाय खा. बदामाच्या संख्येबद्दल बोलायचे झाल्यास ते वय आणि वजनानुसार बदलते.

मात्र घरांमध्ये, लहान मुले आणि प्रौढांना त्यांच्या उंचीनुसार खाण्यासाठी बदाम दिले जातात. उदाहरणार्थ जर मुल 5-10 वर्षांचे असेल तर त्याला दररोज 2-4 बदाम खायला देतात. जर एखाद्याचे वय 18-20 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला 6-8 बदाम दिले जातात. स्त्रिया देखील कमी प्रमाणात बदाम खातात, परंतु गाईडलाईन्स याच्यापेक्षा वेगळे सांगतात.