मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलनही केलं.
मार्च 2023 मध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत. या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरात असे 10 हजारहून अधिक उमेदवार असल्याचे या मागणीपत्र नमूद करण्यात आलं आहे. कोरोना काळात भरती रखडल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक अनेक उमेदवार अडचणीत सापडले असून या उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट मिळत भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.