फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा : जरांगे पाटील

मुंबई : मनोज जरांगे पाटिल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताला जरांगे पाटलांनी फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

जर अशीच दडपशाही सुरु राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन तुम्हाला पाणी पाजतील’. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्य सरकारमधील मंत्री जरांगे पाटलांना काय उत्तर देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.