महिला दिन निमित्त भव्य प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : सन्मानी इव्हेंट्स  यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून 9 व 10 मार्च रोजी बालाजी गार्डन नागाळा पार्क येथे सकाळी 11 ते रात्री 9 या दरम्यान भव्य प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन्मानी  इव्हेंट्स प्रस्तुत शॉपिंग फूड फेस्टिवल आणि फन या प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन सर्वांसाठी खुले असून यामध्ये विविध रेसिपी स्पर्धा, महिलांसाठी तृणधान्य वापरून पदार्थ बनवण्याची स्पर्धा,  लहान मुलांसाठी कुकिंग विदाऊट गॅस, फॅन्सी ड्रेस तसेच कपल्स साठी जोडी तुझी माझी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये शॉपिंग, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा खजिना कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून याचा लाभ जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी घ्यावा याचे आवाहन सन्मानी इव्हेंट्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.