मुंबई: एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, तर त्यांची औकात काय?एकनाथ शिंदे बेकायदेशीरपणे पदावरती बसले आहेत. भाजपचे एक जुने स्वप्न आहे, शिवसेनेला तोडा म्हणून ते सफल होत नाही आहे. ईडी सीबीआयच्या माध्यमातून काही लोक तोडून सरकार बनवली आहे.
आता आमच्याच लोकांना आमने समोर करून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. हे प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री नसते, दिवाळी नसती तर त्या शाखेवर आम्ही कब्जा केली असता. मुंब्रा शिवसेना शाखे संदर्भात अधिकृत कारवाई सुद्धा सुरू होणार आहे. एकनाथ शिंदे यांची चोरांची टोळी आहे, ही गॅंग आहे असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले की, भाजपची नेहमीच नजर असते की, दोघांमध्ये कधी भांडणं होणार? भाजपचा हाच विचार आहे. भाजपचा विचार जात, धर्म, पक्ष तोडा दुसरा कोणता विचार भाजपकडे आहे? एकनाथ शिंदे ,अजित पवार आणि आसामचे मुख्यमंत्री ज्यांच्या वर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती, आता हे भाजपचे प्रचारक आहेत का? भाजपचा विचार सत्ता, पैसा आणि उद्योग हेच आहे. लोकांना गुलाम बनवणे हाच भाजप विचार आहे. मुख्यमंत्री नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून उडेल? ते बघा. मग तुम्ही कोणत्या बार मध्ये आहात ते कळेल. शिवसेनेचा बार पन्नास वर्षे बाळासाहेब ठाकरेंपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार उडवला आहे, तो बघा आधी अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली.
पुढे ते म्हणाले, ३१ डिसेंबर नंतर बोला. दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी त्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची बेअब्रू केली आहे. त्यांनी शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईमध्ये आम्ही गेलो हजारो शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते, पोलीस आले होते. आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला, नक्कीच संघर्ष टळला. लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यांचा परिवार तुटणार नाही. एकनाथ शिंदेंसारखे गुडघे टेकणार नाहीत. महाराष्ट्र, छत्तीसगड, बंगाल, राजस्थान या राज्यामध्ये भाजप हरणार आहे असा दावा संजय राऊतांनी केला आहे.