मुंबई : पूष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जूनला आपल्या मराठमोळ्या लूकमध्ये मराठी माणूस खुश झालाय. मात्र, लूक मराठी असतानाही भाषा हिंदी वापल्याने अनेक चाहत्यांनी निराशा झाली आहे. अल्लू अर्जून हा एका ऑनलाइन बस बुकींग देणाऱ्या कंपनीचा ब्रँड अँब्डेसिडर आहे.त्यामुळे, त्याने या बसच्या प्रमोशनसाठी जाहिरात केली असून मराठमोळ्या ग्राहकांना उद्देशून त्याने ही जाहिरात केली आहे.
या जाहिरातीत त्याच्यासोबत केतकी माटेगावकरही दिसून येते.पुष्पाचा मराठमोळा लूक एका जाहिरातीच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे नाशिक बस स्थानकावर उभ्या असलेल्या नाशिक-पुणे बसमध्ये गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला अल्लू अर्जून दिसून आला. अल्लू अर्जूनसोबत मराठी अभिनेत्री केतकी माटेगावरही पाहायला मिळाली.
केतकीने स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही जाहिरात शेअर केली आहे. तसेच, ही अभिमानाची बाब असल्याचंही तिने म्हटलंय.”अल्लू अर्जुनच्या पहिल्या महाराष्ट्रासाठी बनवण्यात आलेल्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. हा दुर्मिळ योग जुळवून आणल्याबद्दल आभार”, असे कॅप्शन केतकीने या पोस्टसोबत दिलं आहे.
अल्लूचा लूक भारी, अल्लूची जाहिरात भारी, पण जाहिरातीतील त्याची बोली भाषा नाही मराठी, म्हणून मराठी माणूस नाराज झाला आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये केतकी माटेगावकर आणि गिरीश कुलकर्णी यांनीही काम केलंय. त्यांच्यासमवेत अल्लू अर्जून बस बुकींग कंपनीची जाहिरात करताना दिसून येतोय. मात्र, जाहिरात हिंदी भाषेत बनवण्यात आल्यामुळे अनेकांनी केतकीला कमेंट करुन ट्रोलही केलं आहे.