महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे द्राक्ष परिषद

पुणे  : पुण्यात आज द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे द्राक्ष परिषद भरवण्यात आली आहे. या द्राक्ष परिषेदला देशाचे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली.

शरद पवारांच्या हस्ते द्राक्ष प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी या द्राक्ष प्रदर्शनाची पाहणीही केली.यावेळी शरद पवार यांनी द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. राज्य सरकारने आढावा घेतला पाहिजे. एकुण क्षेत्र किती आणि पीक किती आहे. त्यांनतर अनेक कामे करता येतील. पावसाने या पिकाच नुकसान होत. त्याचा सुध्दा आढावा सरकारनं घेतला पाहिजे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

🤙 8080365706