मुंबईतील दुग्धशाळेमुळे गोकुळची वर्षाला बारा कोटी रुपयांची बचत: अरुण डोंगळे

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय, कोल्हापूर येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली व संचालकमंडळाच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि मुंबईतील दुग्धशाळा व पॅकिंग सिस्टीम मुळे गोकुळ दूध संघाची वार्षिक तब्बल सरासरी बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे. या बचतीच्या रकमेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवून, त्यांना आणखी चार जादा पैसे मिळतील यापद्धतीने नियोजन करू अशी ग्वाही दिली.

पुढे बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले, गोकुळमध्ये दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून कामकाज केले जात असून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळीचे सहकार्य आणि गोकुळच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची साथ यामुळे काटकसर व बचतीचा कारभार सुरू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बळावर वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गोकुळ दूध संघ निश्चितपणे साध्य करेल.’असा विश्वास व्यक्त केला. व पुढे बोलताना म्हणाले कि जनावरांच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठी गोकुळचे मिनरल मिक्चरवर १५% अनुदान देणेत आले आहे तसेच दुध उत्पादकांना शास्त्रोक्त पद्धतीने दुग्ध व्यवसायाची माहिती होणेसाठी माणकापूर तालुक निपाणी येथील प्रफुल्ल माळी यांची म्राकोट्रेनिंग सेंटरसाठी निवड झाली आहे याचा दूध उत्पादक व संस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केली.

यावेळी जेष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले कि हातकणंगले तालुक्याचा भौगीलिक विचार केला असता इतर तालुक्याच्या तुलनेत गोकुळला म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी आहे, त्यामध्ये म्हैस दूध वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व संकलित झालेले सर्व दुध संघास पाठवावे असे आवाहन केले .यावेळी स्‍वागत व प्रस्ताविक संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला.

गोकुळ मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरवण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले व संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील,प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दुध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकणंगले तालुक्यातील दूध संस्थाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

🤙 8080365706