कोल्हापूर : महिला बचत गटांची स्थानिक उत्पादने, रानफळांवर आधारीत प्रक्रीया उत्पादने यांची विक्री केंद्र उभारून करून येथील पर्यटन उद्योगाला गती देता येईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला. उमेद अभियान अंतर्गत आंबा येथे आयोजित महिला शिबीरात ते मार्गदर्शन करीत होते.यावेळी प्रकल्प संचालक सुषमा देसाई व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी सह्यगिरी महिला बचत गटाने मांडलेल्या रानभाजी व रानमेवा प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केले.यावेळी बांबू आर्ट,शेती पूरक प्रक्रीया उद्योग,बांबू लागवड, प्रशिक्षणे,विक्री केंद्र यांची मागणी महिला बचत गटांनी केली.
यावेळी तळवडे,चाळणवाडी,आंबा, चांदोली, घोळसवडे, निळे, पुसार्ळे, परळेनिनाई, वालूर, येलूर येथील महिला ग्राम संघाच्या सदस्या उपस्थित होते.
स्वागत सायली लाड यांनी केले.प्रास्तविक दिगंबर सावंत यांनी केले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील व प्रकल्प संचालक देसाई यांनी महिलांशी संवाद साधून उमेद अभियान अंतर्गत योजनांचा आढावा घेतला.
यावेळी शाहूवाडी च्या गटविकास अधिकारी सुष्मिता शिंदे,विस्तारअधिकारी पंचायत ए. एस. कठारे, डॉ.निरंकारी शहा, योगेश फोडे, माजी सरपंच अनिल वायकूळ,उपसरपंच डी.जी.लांबोर,सदस्य दिपक कोलते,व व सुलतान पटेल,अनिता कांबळे, केंद्रप्रमुख राजेंद्र लाड,श्रुती पाटील,निता वारंग आदी प्रमुख उपस्थित होते. ग्रामसेवक सुभाष पाटील यांनी आभार मानले.