महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना

कोल्हापूर :  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. सन 2023-24 अर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील हिंदू -महार, नवबौध्द, हिंदू-बुरुड, हिंदू -खाटीक, वाल्मीकी, मेहतर व बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभधारकांना आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसायीक प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी केले आहे.            

प्रशिक्षण योजना-  सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेसाठी 80, बीजभांडवल योजनेसाठी 80, प्रशिक्षण योजनेचे 320 व एनएसएफडीसी योजनेचे उद्दिष्ट मुख्यालयाकडूल प्राप्त झालेले आहे.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा कार्यालयांकरिता राज्य शासनाच्या अनुदान योजना, बीज भांडवल योजना प्रशिक्षण योजना तसेच एनएसएफडीसी योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदार चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडहा अंतर्गत येणाऱ्या जाती वगळता) ऑनलाइन पध्दतीने अर्ज http://nbmahapreit.in या पोर्टलवर अर्जदारांनी नोंद करावी असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या कोल्हापूर श्री. पवार यांनी केले आहे.अर्ज ऑनलाईन करताना काही अचडणी उद्भवल्यास info@mpbcdc.in या ई-मेल वर संपर्क साधावा.