‘ऑपरेशन कमळ’ मधून पहिला हल्ला शिवसेनेवर आणि दुसरा राष्ट्रवादीवर : पृथ्वीराज चव्हाण

इचलकरंजी : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सामना करून शकत नाही, लोकसभेला अपेक्षित यश मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानेच भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यास सुरुवात केली. त्यातूनच पहिला शिवसेनेवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी दुसरा हल्ला राष्ट्रवादीवर केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली.

या फुटीनंतर राज्यात नेमके कोण कोणाकडे गेले हेच कळेना झाले आहे, असेही ते म्हणाले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी ते शनिवारी इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.