
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी यात आपला सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच तिरंग्या सोबतचा सेल्फीharghartiranga.com या लिंक वर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

भारतीय ध्वज संहितेच्या अधिन राहून राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकवायचा आहे. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.