कोल्हापूर:माजी अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर व चेअरमन राजीवजी सहकारी सूतगिरणी लि.कोल्हापूर राहुल पी.पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांना करवीर मतदारसंघातील कसबा बीड, कुडीत्रे, केर्ले, केर्ली, खुपिरे, गणेशवाडी, पाडळी बु., बहिरेश्वर, भाटणवाडी, वाकरे, वरणगे, शिंदेवाडी, साबळेवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सोनाळी, हसूर, हिरवडे दुमाला या

१८ गावांतील शेतजमिनी वाचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदन दिले.
तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध असून, शेतीचे नुकसान व होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त होण्यापासून वाचवण्याची विनंती केली.
