महावितरण कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर : महावितरणच्या जरगनगर शाखेतील वीजकर्मचाऱ्यांनी संभाजीनगर रेसकोर्स नाका येथील दोन गरजू व्यक्तींना दीड महिन्याचे राशन देवून सामाजिक बांधिलकी जपली.

जरगनगरचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार वागळे यांना सामाजिक कार्यकर्त्या राणीताई गायकवाड यांनी दोन वृद्ध व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्या दोन व्यक्तींना जरगनगर शाखेच्या वीज कर्मचाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तुंची मदत केली. तसेच जरगनगर शाखेतील वीजकर्मचाऱ्यांनी वाढदिवसाचा केक वा हार तुरेचा या खर्चास फाटा देत गरजू लोकांना धान्यस्वरूपात मदत करण्याचा संकल्प केला आहे. जरगगर शाखेतील यंत्रचालक समुद्रे मिस्त्री यांच्या वाढदिवसापासून यांची सुरुवात करण्यात आली. एका गरजू आजींना यावेळी धान्य देण्यात आले.