डॉ.डी. वाय. पाटील ज्यूनिअर कॉलेजच्या तिघांचे सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत यश

कोल्हापूर : “दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ़ इंडिया”कडून घेण्यात आलेल्या सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत डॉ. डी.वाय पाटील ज्यूनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यानी यश मिळवले आहे.

ज्यूनिअर कॉलेजच्या अथर्व संतोष खटावकर याने या परीक्षेत 400 पैकी 333 गुण मिळवले आहेत. तर जिगिशा अजय सबनीस याने 276 गुण व इव्हान इनास कुटिन्हो याने 234 गुण मिळवत यश संपादन केले. सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटट होण्यासाठीची पहिली परीक्षा म्हणून ही परीक्षा ओळखली जाते. या विद्यार्थ्यांना कॉमर्स शाखेच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यानी अभिनंदन केले.