माजी पोलीस पाटील मारुती कांबळे यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न

खूपिरे : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना माजी संचालक व बजरंग दूध संस्थेचे संचालक तसेच खुपिरे गावचे माजी पोलीस पाटील ज्यांनी सहकारातून गावची सेवा केली ते म्हणजे कालकथित मारुती जिनाप्पा कांबळे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त बौद्ध पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी त्यांच्या कार्य आणि कर्तृत्व विषयी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.या कार्यक्रमाचे औचित्य साधून पोलीस पाटील परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विविध गावातील त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार व खुपिरे गावातील विविध संस्थांचे संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम बौद्ध पद्धतीने बौद्धाचार्य आर. के .पेंटर व सुनील कांबळे यांनी पार पाडला.या कार्यक्रमास करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, दत्त समूहाचे नेते आनंदा कृष्णा पाटील, दत्त सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय तुकाराम पाटील व संचालक मंडळ, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन गजानन पाटील (डांगरे ) व अन्य संचालक मंडळ, विठ्ठल पाणीपुरवठा नंबर 2 चेअरमन एकनाथ धोंडी पाटील व संचालक मंडळ, माविम अध्यक्ष दिपाली महेश कांबळे, महेश मारुती कांबळे, खुपिरे गावचे माजी उपसरपंच युवराज पाटील ,उपसरपंच सागर पाटील ,पैलवान तानाजी पाटील गवळी आदी उपस्थित होते.